Monday, July 31, 2017
व्यक्ती एक . . . चेहरे अनेक
असाच काहीसा अनुभव गेल्या काही दिवसात सोशल मीडियात आणि विशेषत: फ़ेबुवर येतोय. उच्च अभिरुची ते हीन जातीयवाद व्हाया अश्लीलता आणि प्रबोधन असे निरनिराळे अजेंडे राबवणाऱ्या अनेक ग्रुपवर काही लोक वेगवेगळे मुखवटे परिधान करून बेमालूमपणे वावरतात.
बाकी स्त्री-दक्षिण्याचे कैवारी आणि प्रत्येक बाईचा हटकून ताई, दीदी वगैरे उल्लेख करणारे पुरुष आणि इनबॉक्स गप्पांच वावडं असणाऱ्या (किंवा किमान तसं दाखवणाऱ्या) काही स्त्रिया एखाद्या अश्लील (मला अश्लीलतेच वावड नाही) आणि अभिरुचीहीन पोस्टवर ज्या प्रकारच्या कमेंट करतात ते पाहिलं कि क्षणभर माझा स्वत:च्या डोळ्यावरचा विश्वास उडून जातो.
अर्थात, कोणाची काय आवड निवड असावी किंवा कोणी कुठे काय लिहाव - लायकाव हा ज्याचा त्याचा प्रश्न, फक्त त्यांनी साळसूद आणि सज्जनपणाचा आव आणून कांगावा करू नये एवढीच अपेक्षा - सक्ती नाही.
*** परत एकदा तळटीप: ***
मला अश्लीलता वगैरे वर्ज्य नाही. मी पण थोडा "गिरीश बापट" आहे. पण केजरीवाल नाही.
12/01/2016
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment