Monday, July 31, 2017
फकीर नाईक
आज माहितीच्या महाजालावर भटकता भटकता अपघाताने कोण्या झाकीर नाईक च्या विडीओशी टक्कर झाली. आपल्या आणि इतरांच्या धर्माबद्दल एवढी अगाध माहिती असलेला (किमान प्रथमदर्शनी तसं दाखवणारा) महाभाग मी पहिल्यांदाच पाहीला. हा रोज गीता, बायबल, कुराण, इ. चा काढा पीत असावा असा मला सतत भास होत होता.
सभेमध्ये जमलेल्या इतर धर्मीय लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना / हरकतींना अगदी त्या त्या धर्मग्रंथातले दाखले देत हा मनुष्य (?) अशी काही उत्तरे देत होता की सामान्य प्रेक्षक अचंबित व्हावा. ह्याच्या डझनभर भाषणातील काही ठळक मुद्दे:-
१. म्हणे मानवजातीच्या अस्तित्वाबरोबरच इस्लाम अस्तित्वात आला, त्यामुळे हाच खरा धर्म.
२. एक नवीन जावईशॊध:- मूळ हिंदू धर्मात मूर्तीपूजा निषिद्ध आहे, त्यामुळे राम, कृष्ण वगैरे देव किंवा अवतारांना मानण, पूजा करणं म्हणजे धर्मद्रोह.
३. निष्पाप जीवांची हत्या इस्लाम ला मान्य नाहीं. (कमालच झाली आता)
अजून बरंच काही आहे, पण मुलत: माझा बुध्यांक कमी असल्याने माझ्या लक्षात राहिले नाही म्हणा हवे तर. (तसंही संगणकाच्या जमान्यात मेंदूच गोडाऊन करण्याची मला गरज वाटत नाहीं) या सगळ्या भाषणांचा सारांश मात्र विचार करायला लावणारा आहे.
१. एखाद्या विषयावर डिबेट करत असताना साधारणत: सबंधित लोकांनी पूर्वग्रह दुषित असू नये असा अलिखित का असेना नियम आहे. माझ्या मते एक विशिष्ट मत बनवून मग धर्माच्या उच्च-निचतेबद्दल चर्चा करणं म्हणजे गर्भलिंग निदान केल्यानंतर मुलगा कि मुलगी होणार यावर बेटिंग घेण्यासारख आहे.
२. हिंदू धर्म परमेश्वर एकंच आहे, मात्र त्याच्याजवळ पोहोचण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत अशी शिकवण देतो. दुसर्या बाजूला इतर धर्म आम्हीच मोठे, आमचंच खर म्हणून थांबत नाहीत. तर त्याहीपुढे जाऊन शिकवण न मानणार्याला मृत्युदंड देण्याची, प्रसंगी नरकात पाठवण्याची भाषा करतात. तरीही हिंदू सगळे धर्मांध आणि बाकी सगळे निधर्मी, सेकुलर कसे?
हि सगळी भाषणं ऐकल्यावर एक गोष्ट निश्चितपणे मी सांगू शकतो कि ज्या धर्मामध्ये किंवा संप्रदायामध्ये असे झकमारे नाईक आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारे लोक आहेत, त्या धर्मातील लोक कधीही भारतासारख्या खंडप्राय देशाच्या मुख्य धारेमध्ये सामील होण्याची शक्यता नाही. मग कोणीही कितीही ********* आपटू देत.
15/04/2014
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment