Monday, July 31, 2017
बदलाची सुरुवात स्वतःपासून
प्रसंग साधारण १५ वर्षांपूर्वीचा आहे.
स्थळ : बावला मस्जिद समोर, डिलाईल्स रोड.
संध्याकाळच्या वेळी मी एका भैय्याच्या गाडीवर कलिंगडाचा आस्वाद घेण्यात मग्न. एक तिशीतला सभ्य कॅटेगरीत मोडणारा गृहस्थ माझ्याच बाजूला उभा होता. त्यानेही दोन फोडी खाल्या, काही पार्सल घेतल्या. त्याचे पैसे भैय्याला चुकते केले.
पाठीमागून एक तरुण आला. भैय्याच्या कानाखाली कडकडीत जाळ काढला.
क्या बे माXXचोX , हमसे पैसा लेंगा? तेरेकु मालूम कौन है ये? - मेरे भाऊजी. समझा? आईंदा गलती करेगा ना . . . . (पुन्हा एक लाथ घालून तो आपल्या प्रिय भाऊजींना घेऊन निघून गेला)
भैय्या एक हात गालावर आणि दुसरा पार्श्वभागावर चोळत "तो" गेल्याच्या दिशेने "सॉरी भाई" म्हणत आसवं गाळत राहिला.
न राहून मी विचारलं, "कौन था वह?"
- साब, बीएमसी कि कचरे कि गाडी का मुकादम है।
****************************************************
लोक म्हणतात बदल हवा. सुरुवात कोणी आणि कुठून करायची?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment