कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्याचे बरेच फायदे असतात. तोटेही असू शकतात. मला तोटे नगण्य अनुभवायला मिळाले, त्यामुळे मी इथं फक्त फायद्यांबद्दल बोलणं पसंद करेन.
सगळ्यात पहिलं म्हणजे काम करण्यासाठी एक "Established System" उपलब्ध असते. प्रत्येक छोट्या छोट्या कामांसाठी Standard Operating Procedure असतात, त्याबरहुकूम काम केलं तर चुकण्याची शक्यता कमी असते. काही ठिकाणी बदल आवश्यक असले तर मर्यादित स्वरूपात तसं करण्याची मुभा असते. दुसरं म्हणजे तुम्ही केलेल्या कामाचं मूल्यांकन करण्याची पद्धत आणि त्यावर पुढची प्रगती अवलंबून असल्याने आपल्यातल्या योग्यतेला न्याय मिळण्याची शक्यता अधिक असते. या व्यवस्थेत गैरप्रकारही होतात, पण त्याचं प्रमाण कमी असतं. आपल्या नावाबरोबर एक ब्रँड जोडला जातो, ज्याचा बऱ्याच ठिकाणी फायदा होत असतो.
मला कॉर्पोरेट क्षेत्रात विशेष महत्वाची बाब वाटते ती म्हणजे नामवंत संस्थांच्या मार्फत मोफत उपलब्ध असलेली प्रशिक्षण व्यवस्था. बरेच लोक या प्रशिक्षण कार्यक्रमांना हलके घेतात किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. काही काळानंतर दुर्लक्ष करणारे आणि इतरांमधला फरक पदोपदी जाणवायला लागतो. गेली १९ वर्षे सबइंजिनिअर ते सिनिअर मॅनेजर ह्या प्रवासात कित्येक टेक्निकल आणि बिहेवीअरल ट्रेनिंगमधून जातानाचा व्यक्ती म्हणून स्वतःतील बदल मला स्पष्ट जाणवतो.
नुकतंच गेल्या एप्रिलमध्ये प्रमोशन झालं ते फक्त डेझिग्नेशन बदलणारं नसून केडर बदलणारं होतं. ज्युनिअर मॅनेजमेंट मधून मिडल मॅनेजमेंटमध्ये प्रवेश करताना गरजेचा असलेला mindset आणि management skills विकसित करण्यासाठी आमच्या Learning Organisation ने एक दीड वर्ष कालावधीचा program बनवलाय, ज्यामध्ये चार मॉड्युलस असतील. प्रत्येक मॉड्युल संपल्यानंतर एक प्रोजेक्ट दिला जाईल आणि तो यशस्वीरित्या पूर्ण केल्यास Certificate सुदधा दिलं जाणार आहे.
माझं एक मॉड्युल पूर्ण झालंय आणि ९/१० फेब्रुवारीला दुसऱ्या मॉड्युलचं ट्रेनिंग पूर्ण होऊन आता प्रोजेक्ट करायचा आहे. खूप काही नवीन शिकायला मिळतंय. त्यामुळे माझ्यातला "आजीवन विद्यार्थी" प्रचंड खुश आहे.
Not sure about time, पण वेळ मिळाला तर शेअर करत जाईन.
No comments:
Post a Comment